adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी चंदननगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांची वाहतूक शाखेत बदली !

 पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी चंदननगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांची वाहतूक शाखेत बदली !   संभाजी पुर...

 पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी चंदननगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांची वाहतूक शाखेत बदली ! 


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे शहर पोलीस दलात दोन दिवसांपूर्वी  जवळपास 25 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली असून यामध्ये गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षकांकडे आता पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी नुकताच चंदननगर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्याकडून स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक निलेश बडाख यापूर्वी वारजे माळवाडी,मुंढवा यासह अशा विविध ठिकाणी उल्लेखनीय  सेवा बजावली आहे. तर पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी चंदननगर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिल्या. चंदननगर परिसरांत अवैध धंदे  गुन्हेगारींवर कायम त्यांचा अंकुश ठेवत त्यांनी विशेष मोहीम राबवली होती. पिस्तूल जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर त्यांची चांगलीच करणे नजर राहिली होती. आता त्यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतरही चंदननगर पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष आणि खमक्या मिळाल्याचे चंदननगरच्या परिसरांत सध्या  चर्चा आहे.

No comments