adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूरच्या सोनल खर्चेची आंतरराष्ट्रीय झेप आशियाई सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात सलग दुसरी निवड

  मलकापूरच्या सोनल खर्चेची आंतरराष्ट्रीय झेप आशियाई सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात सलग दुसरी निवड   अमोल बावस्कार बुलढाणा: (संपादक -:-...

 मलकापूरच्या सोनल खर्चेची आंतरराष्ट्रीय झेप

आशियाई सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात सलग दुसरी निवड  


अमोल बावस्कार बुलढाणा:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर शहराच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत येथील सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर व तालुका क्रीडा संकुल येथील प्रतिभावान खेळाडू कु. सोनल गणेश खर्चे हिची सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आगामी आशियाई सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा (Asian Championship) ३ फेब्रुवारी २०२६ पासून चंदिगड येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सोनल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सोनलने गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळवत आपल्या खेळाचा दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडलेल्या ‘खेलो इंडिया अस्मिता वुमन लीग’ (वेस्ट झोन) स्पर्धेत तिने सीनियर गट डबल्समध्ये सुवर्ण पदक तर सिंगल्समध्ये कांस्य पदक पटकावले.

मार्च २०२५ मध्ये नोएडा येथे झालेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल’ स्पर्धेत सोनलने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत तिरंगा फडकावला होता. आतापर्यंत तिने ८ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून शालेय नॅशनल (रायपूर व देवास – २०२४) मध्ये सलग दोन सुवर्ण पदके, देवास येथे रौप्य पदक, तसेच जम्मू–काश्मीर येथे झालेल्या सीनियर नॅशनल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सोनलच्या या यशामागे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांचे शास्त्रोक्त व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. मलकापूरसारख्या शहरातून सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवल्याबद्दल पळसकर सरांसह सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनलच्या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, कार्याध्यक्ष राजेश महाजन, सचिव विजय पळसकर, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, तसेच राजेश्वर खगार, चंद्रकांत साळुंके आदी मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments