adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले पत्रकार चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले पत्रकार चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  चोपडा तालुक्यातील विचखेडा येथील रहिवासी तथा दै. ...

 बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले पत्रकार चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


चोपडा तालुक्यातील विचखेडा येथील रहिवासी तथा दै. देशदूत चे पत्रकार श्री. चंद्रकांत गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. सामाजिक, सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पाटील यांना विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्री. पाटील हे केवळ एक धडाडीचे पत्रकार नसून सहकार क्षेत्रातील जबाबदार पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. ते तापी शेतकरी सहकारी सूत गिरणी, चोपडा येथे संचालक म्हणून कार्य पाहत आहेत. तसेच विवेकानंद मंजूर सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. विचखेडा विकास सहकारी सोसायटीत व्हाइस चेअरमन पदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

याशिवाय सृष्टी पाणी वापर संस्था (हतनूर धरण) चे चेअरमन तसेच हतनूर कालवा प्रकल्प स्तरीय पाणी वापर संस्थेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध माध्यमांतून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पाणी व्यवस्थापन, सहकार चळवळ आणि ग्रामीण विकास या विषयांत त्यांची विशेष आस्था असून त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत.

पत्रकार म्हणून त्यांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडत नेहमीच सत्य व निर्भीड लेखन केले आहे. स्थानिक पातळीवरील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक बांधिलकी आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. मित्रपरिवारात साधेपणा, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची तत्परता यामुळे त्यांना विशेष मान आहे. आपल्या कार्यातून त्यांनी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. अशा या कर्तृत्ववान, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भविष्यातील कार्यासाठी भरभरून यश लाभो, हीच सर्वांची सदिच्छा.

संकलन

शामसुंदर सोनवणे (पत्रकार)

व्यवस्थापकीय संपादक नेशन महाराष्ट्र

हातेड/ चोपडा मो. 8208449983

No comments