वनावल येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार शिबीर शिरपूर तालुका प्रतिनि...
वनावल येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
१४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार शिबीर
शिरपूर तालुका प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वनावल (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. साप्ताहिक खान्देशी लिडर वृत्तपत्राच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर शिबीर शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा, वनावल येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल, धुळे येथील डॉ. इस्माईल हुसेन व डॉ. विरेंद्र गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये नेत्र तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
गावातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येणार असून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वसिम खाटीक
संपादक, साप्ताहिक खान्देशी लिडर वृत्तपत्र
ता. शिरपूर, जि. धुळे


No comments