adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे विद्यार्थ्यांना कपडे वाटप

 समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे विद्यार्थ्यांना कपडे वाटप   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमक...

 समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे विद्यार्थ्यांना कपडे वाटप 


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे निमित्त जि. प. शाळा, मोहमांडली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. मोहमांडली हे गाव अतिदुर्गम आदिवासी भागात असून येथील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कपडे मिळावेत, तसेच शिक्षणाबरोबरच त्यांच्यात आत्मसन्मान व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच समता फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समता फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून, ग्रामस्थांनी समता फाऊंडेशनचे आभार मानले.

No comments