adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिर्डीत दलालांचा अड्डा उद्ध्वस्त! भाविकांना लुटणाऱ्यांवर प्रशासनाचा चाप..‘जलद दर्शन’च्या नावाखाली लूट थांबणार? उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी आदेश लागू

 शिर्डीत दलालांचा अड्डा उद्ध्वस्त! भाविकांना लुटणाऱ्यांवर प्रशासनाचा चाप..‘जलद दर्शन’च्या नावाखाली लूट थांबणार? उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा का...

 शिर्डीत दलालांचा अड्डा उद्ध्वस्त! भाविकांना लुटणाऱ्यांवर प्रशासनाचा चाप..‘जलद दर्शन’च्या नावाखाली लूट थांबणार? उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी आदेश लागू 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-जागतिक कीर्तीच्या शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात भाविकांना अडवून आर्थिक लूट करणाऱ्या दलालांचे आता धाबे दणाणले आहेत.साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक,‘जलद दर्शन’चे आमिष,खासगी पार्किंगची सक्ती आणि अवाजवी दराने पूजासाहित्य विक्री अशा प्रकारांना प्रशासनाने अखेर कठोर लगाम घातला आहे.

उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी विशेष कायमस्वरूपी आदेश जारी करत सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भाविकांना थांबवणे,फसवणे, दिशाभूल करणे किंवा अनधिकृत व्यवहार करणे यावर पूर्ण बंदी घातली आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.शिर्डीत सण-उत्सवांच्या काळात लाखोंची गर्दी उसळते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवृत्ती रस्त्यावरच गाड्या अडवून भाविकांना खासगी पार्किंगमध्ये जाण्यास भाग पाडतात. “दर्शन लवकर करून देतो” या बहाण्याने हजारो रुपये उकळले जातात. पूजासाहित्य अवाजवी दरात घेण्याची सक्ती केली जाते. विरोध केल्यास दमदाटी, धक्काबुक्कीचे प्रकारही घडत असल्याचे समोर आले आहे.

बाहेरगावचे भाविक तक्रार करण्यास कचरतात. मात्र, स्थानिक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गेल्या दोन वर्षांत तब्बल ६५ गुन्हे दाखल केले आहेत.वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलीस,श्री साईबाबा संस्थान व नगरपरिषद यांच्या अहवालावरून प्रशासनाने २ फेब्रुवारी रोजी प्राथमिक आदेश काढला होता.काहींनी त्यावर आक्षेप घेतला.मात्र,हा आदेश कोणाच्याही कायदेशीर रोजगारावर गदा आणणारा नसून केवळ उपद्रवी दलालांना रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने सर्व आक्षेप फेटाळून लावले आणि आदेश कायमस्वरूपी लागू केला.रस्ते,चौक,बसस्थानक किंवा मंदिराच्या प्रवेशमार्गावर उभे राहून मध्यस्थी करणे पूर्णपणे बंद संस्थान किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवणे दंडनीय

निवास,भोजन किंवा दर्शनाच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करण्यास मनाई

या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिर्डी पोलिसांना देण्यात आल्या आहेत.नियम मोडणाऱ्यांवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या संबंधित कलमानुसार कारवाई होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, शिर्डीतील दर्शन व्यवस्थेला शिस्त लागणार आहे.आता साईनगरीत ‘दलाली’ नव्हे तर ‘भक्ती’चाच मार्ग मोकळा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments