adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चैतन्य पाटील यांचे डी एम परीक्षेत सुयश

 चैतन्य पाटील यांचे  डी एम परीक्षेत सुयश                 इदू पिंजारी फैजपुर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड )       चैतन्य पाटील यांचे लोकोपयो...

 चैतन्य पाटील यांचे  डी एम परीक्षेत सुयश       


    

    इदू पिंजारी फैजपुर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड ) 

     चैतन्य पाटील यांचे लोकोपयोगी यश भुसावळचे भूमिपुत्र चैतन्य जगन्नाथ पाटील यांनी होमीभाभा नॅशनल विद्यापीठ, मुंबई ने घेतलेल्या डी.एम. ( मेडीकल आन्कोलॉजी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले . डॉ. चैतन्य जगन्नाथ पाटील, टाटा मेमोरीअल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई येथून विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत.कॅन्सर सारख्या क्लिष्ट आजारातील वेदना कमी करणे, निदान उपचार आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा अत्यंत माफक किमतीत उपचार मिळवून देणे या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी डॉक्टररेट ऑफ मेडिसिन मेडीकल आन्कोलॉजी ही कॅन्सरतज्ञ  पदवी नुकतीच संपादन केली. 

खडतर परिश्रम, जिद्द आणि सातत्याने नव्याचा शोध घेण्याच्या वृतीमुळे त्यांनी या अत्यंत कठीण अभ्यासक्रमात  घवघवीत यश प्राप्त केले आहे. आई-वडील माध्यमिक शिक्षक होते.

        तत्पुर्वी वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एसचे शिक्षण नायर हॉस्पिटल, मुंबई तर एम. डी. मेडीसीनचे शिक्षण त्यांनी शासकीय मेडीकल कॉलेज, मिरज येथून पूर्ण केले.

भुसावळ येथील कोटेचा माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक  जगन्नाथ पाटील व  म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मालती भिरुड यांचे ते सुपुत्र आहेत.

No comments