adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर हादरले! शहरातील कोठला भागात गोळीबार..सायंकाळी अचानक फायरिंगने उडाली धांदल तोफखाना पोलिसांची आरोपींचा शोध सुरु

 अहिल्यानगर हादरले! शहरातील कोठला भागात गोळीबार..सायंकाळी अचानक फायरिंगने उडाली धांदल तोफखाना पोलिसांची आरोपींचा शोध सुरु   सचिन मोकळं अहिल्...

 अहिल्यानगर हादरले! शहरातील कोठला भागात गोळीबार..सायंकाळी अचानक फायरिंगने उडाली धांदल तोफखाना पोलिसांची आरोपींचा शोध सुरु  


सचिन मोकळं अहिल्यानगर :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात सायंकाळच्या सुमारास सिनेमा स्टाईलमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही क्षणांसाठी परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी वर्दळीच्या वेळेत अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. काही दुकानांनी तात्काळ शटर खाली ओढून घेतल्याचेही सांगितले जाते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची नाकाबंदी करत संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोळीबार नेमका कोणी केला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वाद, जुना राग किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. या थरारक घटनेमुळे कोठला परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments