शिरपूर येथे पंचायत समिती कार्यालय समोर विनोद करणकाळ यांचे आमरण उपोषण सुरू शिरपूर (प्रतिनिधी) – (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर तालुक...
शिरपूर येथे पंचायत समिती कार्यालय समोर विनोद करणकाळ यांचे आमरण उपोषण सुरू
शिरपूर (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर तालुक्यातील ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती न दिल्याच्या निषेधार्थ आर.पी.आय. (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष विनोद करणकाळ यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तालुक्यातील काही ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून मागितलेली माहिती तात्काळ द्यावी, अशी मुख्य मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनास आर.पी.आय. (आठवले) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून, जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला यावेळी उपोषण स्थळी उपोषण कर्ता विनोद करणकाळ तालुका उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सचिव नरेंद्र बी. गवळे, तालुका अध्यक्ष नर्मदाबाई आर. भिल, जेष्ठ मार्गदर्शन तथा शाखा प्रमुख एकनाथ वाघ है उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.


No comments