adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

औसा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा; शेतरस्ते, शाळा व पायाभूत सुविधांवर भर..

 औसा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा; शेतरस्ते, शाळा व पायाभूत सुविधांवर भर.. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लात...

 औसा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा; शेतरस्ते, शाळा व पायाभूत सुविधांवर भर..


लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर :  अभिमन्यू पवार यांनी औसा येथे प्रशासकीय बैठक घेऊन औसा तालुका व कासार सिरसी मंडळाशी संबंधित विविध विभाग प्रमुखांकडून विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शेतरस्ते, जिल्हा परिषद शाळांची कामे, तसेच शहरातील प्रलंबित पायाभूत सुविधा यावर विशेष चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुनिश्चित करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार अडवलेली व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंडळनिहाय २५-२५ किलोमीटरचे क्लस्टर तयार करून प्रस्ताव सादर करावेत आणि ज्यांचे मातीकाम पूर्ण झाले आहे अशा रस्त्यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले. पुढील तीन वर्षांत नकाशावरील व संमतीच्या १०० टक्के शेत/पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व १०० टक्के शिवरस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 जिल्हा परिषद शाळांसाठी इमारत बांधकाम, शौचालय, संरक्षण भिंत, किचन शेड उभारणी तसेच सौरऊर्जा व इंटरनेटसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. याशिवाय १ मेपासून किल्लारी येथील अपर तहसीलदार कार्यालय तात्पुरत्या जागेवरून कार्यान्वित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. औसा शहरातील औसा-उंबाडगा रस्ता तसेच औसा टी-पॉइंटपासून शहरात येणाऱ्या रस्त्याच्या बाजूचे नालीकाम तातडीने हाती घेण्याचेही आदेश देण्यात आले. या बैठकीस कृषी, महसूल, वन, मृद व जलसंधारण, महिला व बालकल्याण, आरोग्य, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments