चोपड्यातील वराड गावात सरपंच पदाचा गैरवापर: शासनाची फसवणूक, निधी लाटण्याचा आरोप चोपडा प्रतिनिधी : चंदकांत पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवा...
चोपड्यातील वराड गावात सरपंच पदाचा गैरवापर: शासनाची फसवणूक, निधी लाटण्याचा आरोप
चोपडा प्रतिनिधी : चंदकांत पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वराड ग्रामपंचायतचे सरपंच अजय ईश्वर गवळी यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सरपंच अजय गवळी आणि त्यांच्या आई हिराबाई ईश्वर गवळी यांच्या नामावर घरकुल योजना अंतर्गत मिळालेला निधी दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
सरपंच अजय गवळी यांनी स्वतःचा आणि आईचा निधी पदरी पाडून घेतला असून, कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता जीओ टॅगचे खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून सरपंचास त्याच्या पदावरून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा सरपंचावर योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments