बॅनर-फलक लावण्यापूर्वी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी सक्तीची करण्यात यावी:- माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांची मागणी इदू पि...
बॅनर-फलक लावण्यापूर्वी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी सक्तीची करण्यात यावी:- माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांची मागणी
इदू पिंजारी, फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय महापुरुष, धार्मिक व्यक्ती किंवा नेत्यांचे बॅनर-पोस्टर लावण्यापूर्वी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी करत माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी लेखी निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदन मुख्याधिकारी, फैजपूर नगरपरिषद तसेच पोलीस निरीक्षक, फैजपूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. शहरातील विविध भागांत कोणतीही परवानगी न घेता बॅनर व फलक लावले जात असल्याने भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धार्मिक किंवा राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर अनधिकृतरित्या लावण्यात येणाऱ्या बॅनर-फलकांमुळे समाजात गैरसमज, वाद-विवाद तसेच शांतता भंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई करून केवळ अधिकृत परवानगी असलेल्यांनाच परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
शहरातील सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments