adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने शिवचरित्राचा जागर; साई गणेशा नगरात शिवभक्तांचा भावपूर्ण उत्सव

 छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने शिवचरित्राचा जागर; साई गणेशा नगरात शिवभक्तांचा भावपूर्ण उत्सव अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकां...

 छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने शिवचरित्राचा जागर; साई गणेशा नगरात शिवभक्तांचा भावपूर्ण उत्सव


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 तेल्हारा– छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साई गणेशा नगर येथे शिवप्रेम, अभिमान आणि प्रेरणेचा अविस्मरणीय सोहळा उत्साहात पार पडला. शिवरायांच्या तेजस्वी स्मृतींनी परिसर भारावून गेला असून कार्यक्रमात शिवचरित्राचा जागर करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. वातावरणात “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी दुमदुमाट निर्माण झाला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ह.भ.प. गुरुवर्य गोपाळ महाराज यांनी शिवचरित्रातील पराक्रम, न्यायनिष्ठा, स्वाभिमान, स्त्री-सन्मान आणि स्वराज्याची उदात्त संकल्पना यांचा भावपूर्ण ऊहापोह केला. “शिवचरित्र हे केवळ इतिहासाचे पान नसून प्रत्येक पिढीला धैर्य, कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा जाज्वल्य दीपस्तंभ आहे,” असे प्रभावी प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थित शिवभक्त भारावून गेले.या प्रसंगी छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानचे राजेंद्र पाटील खारोडे, तळहारा बाजारचे पोलीस पाटील जनार्दन पाटील खारोडे, माजी नगराध्यक्ष मुलचंदजी राठी,अशोकराव नेमाडे ,संदीप ताथोड मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी शिवरायांच्या आदर्शांचे स्मरण करत समाजात एकात्मता, शौर्य आणि संस्कार जपण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानचे भैय्या पाटील खारोडे शिवा खारोडे धनराज पवार शेखर भुजबुले सचिन नहाटे संतोष थोरात खूमकर साहेब शांताराम सोनवणे   इत्यादींनी परिश्रम घेतले असंख्य शिवभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभुराजे बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण संस्था व संभुराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेक शिवभक्त उपस्थित होते. शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, प्रेरणादायी आणि भावनांनी ओतप्रोत वातावरणात संपन्न झाला.

No comments