न्हावी ग्रामपंचायत सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील ग्रामप...
न्हावी ग्रामपंचायत सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे यांनी प्रतिमैस पुष्पहार अर्पण केला.पत्रकार ललित फिरके यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. प्रसंगी पत्रकार संतोष बारी, संजय बारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गफ्फार पिंजारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बारी यांनी तर आभार संजय बारी यांनी मानले.

No comments