adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कामरगाव शिवारात कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण व जबरी चोरी! नगर तालुका पोलिसांची झटपट कारवाई; तिघे जेरबंद, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

  कामरगाव शिवारात कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण व जबरी चोरी!  नगर तालुका पोलिसांची झटपट कारवाई; तिघे जेरबंद, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त  सचिन...

  कामरगाव शिवारात कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण व जबरी चोरी!

 नगर तालुका पोलिसांची झटपट कारवाई; तिघे जेरबंद, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-कामरगाव शिवारात कार अडवून कोयत्यांचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल, चाकू-कोयते असा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि.२१/०२/२०२६ रोजी कोथळ,ता.माजलगाव,जि.बीड येथील इसम नामे बाळासाहेब काशिनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम हे रेनॉल्ट कारने जात असताना कामरगाव शिवारातील हॉटेल गुरुदत्त जवळ रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली.आरोपींनी हातात कोयते व चाकू घेऊन फिर्यादी व त्यांच्या साथीदारास शिवीगाळ करत मारहाण केली. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या डोक्याला मार लागून अपघात झाला.आरोपींनी रु.१८,०००/- रोख, रु. ५,००००/- ऑनलाईन ट्रान्सफर, ४७,०००/- किमतीचे मोबाईल,चार्जर,तसेच इतर वस्तू असा एकूण रु.११५,०००रू.किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तुषार विजय उमाप, बुद्धभूषण संतोष आंग्रे (रा.दैठणे गुंजाळ पारनेर),तेजस लक्ष्मण उगलमुगले या आरोपींना अटक करण्यात आली.तसेच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी भोरया उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (फरार) याचा शोध सुरू आहे.तपासादरम्यान आरोपींनी यापूर्वी नगर तालुका हद्दीत अशाच प्रकारे कोयत्याचा धाक दाखवून लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी चास घाटात मध्यरात्री गाडी अडवून सोने-चेन व मोबाईल लुटल्याची माहितीही उघड झाली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीश वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे,पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, नितीन शिंदे,सुभाष थोरात,मंगेश खरमाळे,विक्रांत भालसिंग, मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी केली आहे.

No comments