फैजपूर येथे गजानन विजय पारायण संपन्न फैजपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जय गजानन गृप तर्फे श्री गजानन महाराज यांच्या 148 व...
फैजपूर येथे गजानन विजय पारायण संपन्न
फैजपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जय गजानन गृप तर्फे श्री गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त फैजपूर येथील शिवाजी नगरात दिनांक 8 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापारायण आयोजित करण्यात आलेले होते. या पारायणाचे मुखोद्गत वक्ते सौ संजीवनी मराठे आणि जयंतराव मराठे कराड जिल्हा सातारा या दांपत्य होते परिवाराचा श्री गजानन विजय ग्रंथ जसाच्या तसा तोंडपाठ आहे.
या पारायणासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजराथ,कर्नाटक येथील भाविक मोठ्या संख्येने मागील सात वर्षापासून उपस्थित असतात.यावेळी 780 भाविक पारायणासाठी बसलेले होते.या पारायला सदिच्छा भेट दिली ओंकारेश्वर येथील पूज्य शंकरानंद सरस्वती यांनी सदिच्छा भेट दिली.त्यांनी राष्ट्रनिर्मिती, मानसिक शांती साठी तसेच अध्यात्मिक उन्नती साठीअसे सामूहिक उपक्रम होणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमानंतर लोकशाहीचा स्तंभ म्हणजे पत्रकार यांचा जय गजानन ग्रुप तर्फे ओळख परिचय व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मागील 7 वर्षांपासून या सामूहिक पारायणाचे आयोजन दीपक होले सर, योगराज नारखेडे गिरीश नेमाडे, दिनकर नारखेडे, संजय नारखेडे हे करीत आहेत.
No comments