adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

 अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोच्च पुरस्काराने सन्मान  सचिन मोकळं अहिल्यानगर...

 अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोच्च पुरस्काराने सन्मान 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर: - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिला जाणारा 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६' हा अतिउत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे रविवार, दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झालेल्या सोहळ्यात त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.​सदरचा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्र, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड व राज्यस्तर सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.​आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच दैनंदिन कामकाजाच्या बाबी जसे की आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, विविध शस्त्रक्रिया, सिझेरियन शस्त्रक्रिया, प्रसूती, मातामृत्यू व अर्भकमृत्यू अशा विविध निकषांच्या आधारे राज्यस्तरीय समितीमार्फत रुग्णालयांचे गुणांकन करण्यात आले. या कठोर प्रक्रियेतून महाराष्ट्रातील प्रथम तीन उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये अहिल्यानगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. संजय घोगरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कामकाजाचे उत्कृष्ट नियोजन केले. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुसूत्रता आणत त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली. या सर्व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना व त्यांच्या संस्थेला या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

No comments