adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या हातेड खुर्द ग्राम अध्यक्षपदी वासुदेव बाविस्कर यांची निवड

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या हातेड खुर्द ग्रामअध्यक्षपदी वासुदेव बाविस्कर यांची निवड  शामसुंदर सोनवणे वि.प्र‌ (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या हातेड खुर्द ग्रामअध्यक्षपदी वासुदेव बाविस्कर यांची निवड 


शामसुंदर सोनवणे वि.प्र‌

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील रहिवासी श्री वासुदेव देविदास बाविस्कर (एम.ए., बी.एड.), निवृत्त मुख्याध्यापक, यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी अंतर्गत हातेड खुर्द ग्राम अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाविस्कर यांनी शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ग्राम अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ग्राम अध्यक्ष या नात्याने संघटनेची विचारधारा गावातील घराघरापर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटित करणे, तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविणे, असा त्यांचा मानस आहे. हातेड खुर्द (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे संघटनात्मक बळकटीसाठी ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments