नगर मनमाड महामार्गावर मस्तवाल स्कार्पिओ चालकाचा ‘मृत्यूचा खेळ’..शहर वाहतूक शाखा झोपेतच ? भरदुपारी हिट अँड रनचा थरार..अनेकजण जखमी वाहनांचे न...
नगर मनमाड महामार्गावर मस्तवाल स्कार्पिओ चालकाचा ‘मृत्यूचा खेळ’..शहर वाहतूक शाखा झोपेतच ? भरदुपारी हिट अँड रनचा थरार..अनेकजण जखमी वाहनांचे नुकसान..शहर वाहतूक नियंत्रणावर प्रश्नचिन्ह?
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरात गुरुवारी भर दुपारी बेशिस्त वाहतुकीचा संतापजनक प्रकार घडला. अहिल्यानगर–मनमाड मार्गावर एका मस्तवाल स्कार्पिओ चालकाने वेगाच्या नशेत अनेक वाहनांना धडक देत अक्षरशः ‘मृत्यूचा खेळ’ मांडला.स्कार्पिओ वाहन अतिवेगात आणि बेदरकारपणे सुसाट धावत होते.वर्दळीच्या चौकात नियंत्रण सुटल्यासारखे वाहन दुचाकींवर आदळले.एका दुचाकीस्वाराला काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.नुकसान आणि जखमी काही नागरिक गंभीर जखमी झालेले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात ठिकाणी तात्काळ पोलिसांनी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात वाढती वाहतूक,वेगमर्यादेचे उल्लंघन आणि नियमांकडे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व अंमलदार नेमके करतात तरी काय? फक्त गाड्या अडवून कारवाईचा देखावा की प्रत्यक्ष नियंत्रण? अशी संतप्त चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.“अशा बेदकारपणे गाड्या चालवणाऱ्या लोकांना शिस्त कोण लावरणार?” असा तीव्र सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होत असून, बेदरकार वाहनचालकांवर कठोर आणि तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.

No comments