adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 यावलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:- दि. २७ फेब्रुवारी २०२६ रो...

 यावलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:- दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ. शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शाहरुख खान (भुसावळ) उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून सांगत विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील स्थान स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे त्यांनी कौतुक करत संशोधनवृत्ती जोपासण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना चौधरी मॅडम यांनी केले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक व अभ्यासपूर्ण प्रकल्पांमुळे प्रदर्शनास उपस्थित पालक व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments