उत्तरप्रदेशातुन आलेला मूकबधिर कामगार बेपत्ता झाल्याने शोधाशोध. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- दरवर्षी महाराष्ट्रात...
उत्तरप्रदेशातुन आलेला मूकबधिर कामगार बेपत्ता झाल्याने शोधाशोध.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- दरवर्षी महाराष्ट्रात हजारो कामगार मंजुरीसाठी पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात तसेच चोपडा तालुक्यातील बुधगाव या गावी ऍड.दिनेश वाघ यांच्याकडे गुऱ्हाळावर कामासाठी उत्तरप्रदेशातून 13जण कामासाठी आले होते.
पण होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने हे कामगार आपल्या गावी जातात.हिंदी भाषीक लोकांमध्ये धुलीवंदनाला विशेष महत्व असल्याने दिनांक 25रोजी स्वतः मालक यांनी गाडी करून अमळनेर रेल्वेस्टेशन पर्यंत कामगारांना सोडले.पण अचानक भोला नामक व्यक्ती तिथून कुठं गायब झाली हे कळले नाही. सदर व्यक्ती ही मूक बधिर व त्याला लिहिता वाचता येत नाही. बोलू शकत नाही म्हणून त्याच्या अडचणी वाढल्या असतील असा कयास त्याच्या मित्रांनी लावला असून पोलिसात तक्रार अद्याप पर्यंत दाखल नाही.तो माझियागाव जिल्हा बदायु उत्तरप्रदेश येथील आहे.तो ज्यांच्याकडे कामाला होता त्यांनी व त्याच्या साथीदारांनी त्याचा शोध घेणे सुरू ठेवले असून तो आढळून आल्यास 9520726547 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments