यावल येथे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यशोगाथा अकॅडमी, ...
यावल येथे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यशोगाथा अकॅडमी, यावल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचा विषय “शिवरायांचा इतिहास” हा असून तालुक्यातील विविध गावांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यंदाच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 850 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. छाया ताई पाटील उपस्थित होत्या. तसेच माजी नगराध्यक्ष मा. अतुल पाटील साहेब, सुमाई मंगल कार्यालयाचे मालक अनिल पाटील साहेब, आदिवासी विकास विभागात कार्यरत प्रवीण भिमटे सर, तसेच मुकेश कोळी हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता धनगर या होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी व सुंदर सूत्रसंचालन मोक्षिका धनगर यांनी केले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन राजू सुरणार सर, सुहास भालेराव सर, अभिजीत तायडे सर तसेच सरोजिनी येवले मॅडम यांनी केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी उत्साह व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव भोईटे सर, स्वप्निल सोनवणे, भूषण धनगर, निशांत बाविस्कर, मोहन जयकारे, सुशील लोखंडे, खुशी कोळी, हर्षिता बोरसे कार्तिक बारी, वैभव बारी, हर्षल बारी तसेच यशोगाथा अकॅडमीचे समस्त शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच धीरज साऊंड सिस्टिम यांनी कार्यक्रमासाठी मोफत साऊंड सिस्टिम उपलब्ध करून दिल्यामुळे कार्यक्रमाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने यशस्वीरीत्या राबविला जात असून, या कार्यक्रमाचे आयोजन यशोगाथा अकॅडमीचे संचालक उमेश धनगर सर तसेच समस्त शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अधिक सखोल समजण्यास मदत झाली असून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले

No comments