शहर हादरलं..! मोबाईल दुकानात २० वर्षीय तरुणीचा विनयभंग..दुकानदारावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ...
शहर हादरलं..! मोबाईल दुकानात २० वर्षीय तरुणीचा विनयभंग..दुकानदारावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,मोबाईल दुकानातच एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.संजुर मल्लुद्दीन आलम शेख (रा. अहिल्यानगर) असे आरोपी मोबाईल दुकान चालकाचे नाव असून,त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगरकर मळ्याजवळ वास्तव्यास असणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने काही दिवसांपूर्वी सुपर फाईन मोबाईल शॉपी येथून एक जुना मोबाईल खरेदी केला होता. मात्र,त्या मोबाईलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने संबंधित तरुणी तक्रार घेऊन पुन्हा दुकानात गेली होती. यावेळी मोबाईल दुकान चालक संजुर मल्लुद्दीन आलम शेख याने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागितला.मात्र,तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपीने तरुणीशी झटापट करत तिचा विनयभंग केला.तरुणीने आरडाओरड सुरू करताच आरोपीने तिच्यावर जातीवाचक शिवीगाळ करत पुन्हा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ आपल्या भावाला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.तसेच तिने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी संजुर मल्लुद्दीन आलम शेख याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 74(2), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(w)(i), 3(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोतवाली पोलीस पुढील तपास करत असून,आरोपीवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments