adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोघ पिता पुत्राच्या मृत्यूने लासुरकर हळहळले

 दोघ पिता पुत्राच्या मृत्यूने लासुरकर हळहळले   विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा येथील रहिवाशी मोहम्मद ठोके व ...

 दोघ पिता पुत्राच्या मृत्यूने लासुरकर हळहळले  


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर ता चोपडा येथील रहिवाशी मोहम्मद ठोके व त्यांचे वडील लुकमान खा ठोके यांच्या घार्डी फाटा जवळ अपघाती निधन झाल्यामुळे लासुरकर सर्व धर्मीययांना धक्का बसला आहे . लुकमान खा ठोके हे लहानपणापासून बाबूलाल नथा महाजन यांच्या हॉटेलवर चहा बनवायचे काम करायचे .सकाळी पाच वाजता स्वतः ते हॉटेल उघडायचे. त्यांच्या हातून बनवलेल्या चहाला चवच न्यारी होती .लासुर येथे मुक्कामाला थांबलेल्या एस टी बसचे चालक वाहक त्यांच्या हाताच्या बनवलेला चहा पिऊनच गाडी सुरू करायचे. लुकमान ठोके यांना "खॉसाहेब" म्हणायचे इतर ठिकाणाहून आलेले प्रवासी व पाहुणे मंडळी लासुरला खॉसाहेबांच्या हाताची बनवलेली चहा पिऊनच अन्य ठिकाणी जायचे . सगळ्यांना रामराम करणारा आपुलकीने विचारपूस करणारा लासुर गावाच्या खासाहेब केल्याने सर्व गावकरी शोक व्यक्त करीत आहेत .आता कुठे त्यांची मुलं भंगार व्यवसाय करू लागल्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारत होती परंतु याच व्यवसायात असणारा मोहम्मद ठोके हा त्यांचा मुलगा ही अपघातात मृत्यू पावल्यामुळे कुटुंबावर आघात झाला आहे .

No comments