मजरेहोळ येथे साईबाबांच्या मंदिराचा वर्धापनदिनानिमित्त कीर्तन संपन्न. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:--तालुक्यातील मजरेह...
मजरेहोळ येथे साईबाबांच्या मंदिराचा वर्धापनदिनानिमित्त कीर्तन संपन्न.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:--तालुक्यातील मजरेहोळ येथे साईबाबांच्या मंदिराचा नुकताच रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला.त्यात भव्य शोभायात्रा काढून पायीदिंडी काढण्यात आली.तसेच श्री.सत्यनारायणाची महापुजा करून साईभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे श्रवणीय कीर्तनात त्यांनी श्री.साईभक्तां ना मंत्रमुग्ध करून टाकले.मजरेहोळ येथील साईभक्त सुनील मराठे आणि ग्रामस्थ यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी आसपासच्या ग्रामीण भागातून साईभक्त मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.कार्यक्रमाला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची विशेष उपस्थिती होती.आणि साईभक्तांसाठी गेल्या 25वर्षापासून विविध कीर्तनकारांचे कीर्तन महाप्रसादाचे आयोजन मराठे कुटुंबिय करतात.यावेळी मंदिराच्या समितीचे व्यवस्थापक सुनील भिवसन मराठे,दिलीप भिवसन मराठे,हरी भिवसन मराठे,प्रल्हाद भिवसन मराठे,उत्तम भिवसन मराठे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

No comments