adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

LCB चा अवैध धंद्यांना चाप..! तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 LCB चा अवैध धंद्यांना चाप..! तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :-  संगमनेर उ...

 LCB चा अवैध धंद्यांना चाप..! तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-  संगमनेर उपविभागात वाळू माफिया तसेच अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ५ आरोपींना ताब्यात घेत तब्बल २६ लाख ४५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते.त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि.महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,संतोष खैरे,योगेश कर्डीले, अमृत आढाव,बाळासाहेब गुंजाळ,महादेव भांड यांचे पथक गठीत करून संगमनेर उपविभागात कारवाई करण्यात आली.दि.०७ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत डिग्रस गावच्या शिवारात दोन डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला.त्याठिकाणी प्रकाश भाऊसाहेब कोरडकर (वय २०, रा.हजारवाडी) व फिरोज सुलतान शेख (वय २५, रा. डिग्रस) हे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले.

त्यांच्याकडून टाटा कंपनीचे दोन डंपर (एक विना नंबर), ४ ब्रास वाळू असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पिंपरणे ता.संगमनेर येथील हॉटेल गरीब येथे छापा टाकून साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६,रा.पिंपरणे) याच्याकडून ४४,२४० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार (MH-02-BR-9629) असा एकूण ५ लाख ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याशिवाय देवगांव ता.संगमनेर येथे निलेश शशिकांत मुंतोडे (वय २६) व अमोल गुलाब मुंतोडे हे देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून ११,५२० रुपये किमतीची देशी दारू व ५० हजार रुपये किमतीची हिरो स्लेंडर प्लस मोटारसायकल (MH-17-CN-6760) असा ६१,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संपूर्ण कारवाईत ४ ब्रास वाळू,दोन डंपर, देशी-विदेशी दारू,कार व मोटारसायकल असा एकूण २६,४५,७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

No comments