फैजपूर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव; महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते सत्कार सोहळा उत्साहात इदू पि...
फैजपूर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव; महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते सत्कार सोहळा उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर फाउंडेशन संचलित पत्रकार संघातर्फे आयोजित गुणवंत नागरिक सत्कार सोहळा येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य समारंभात सामाजिक, शैक्षणिक, आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. फैजपूर शहरासह परिसरातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, वकिली, कृषी, क्रीडा, उद्योग, दिव्यांग हस्तकला अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश होता. विशेषतः आदर्श प्राचार्य, आदर्श शिक्षक, कृषिभूषण, उद्योगरत्न, युवा उद्योजक आणि वेटलिफ्टिंगमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. यासोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांचाही पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, दिगंबर महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, नगराध्यक्षा दामिनी सराफ, उपनगराध्यक्षा निकिता कोळी, नगरसेविका अमिता चौधरी आणि सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शेख कुर्बान नगरसेवक महेंद्र मंडवाले नगरसेवक अनंत नेहते नगरसेवक हकीम तडवी नगरसेवक इरफान शेख इरफान माजी नगरसेवक हेमराज चौधरी नगरसेवक अनवर खाटीक नगरसेवक गोटू भारंबे नगरसेवक डॉक्टर दानिश शेख निसार नगरसेवक दिपाली जितेंद्र भारंबे नगरसेविका नीलिमा राजेश महाजन प्रियंका ईश्वर इंगळे नगरसेवक शे.आवेश भांजा माजी उपनगराध्यक्ष कलीम खान मण्यार नगरसेवक नगरसेवक रशीद तडवी माजी सागर होली आदीमान्यवर उपस्थित होते उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात जनार्दन हरिजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक आणि विधायक कार्य करणे ही काळाची गरज आहे. अशा सत्कार सोहळ्यांमुळे समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळते. हा सत्कार केवळ संबंधित व्यक्तीचा नसून, त्याने केलेल्या कार्याचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आहे." तसेच, वर्षभर समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांचा ६ जानेवारी रोजी सन्मान करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वार्ता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे, अध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव शाकीर मलिक, खजिनदार प्रा. उमाकांत पाटील, तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, मयूर मेढे, संजय सराफ, इदू पिंजारी यांच्यासह यावल-रावेर तालुक्यातील अनेक पत्रकारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र राजपूत सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार खजिनदार प्रा. उमाकांत पाटील यांनी मानले. या सोहळ्यास यावल आणि रावेर तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments