adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना टी-शर्ट व साहित्य वाटप

 गलंगीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना टी-शर्ट व साहित्य वाटप  मच्छिंद्र रायसिंग गलंगी, ता. चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी य...

 गलंगीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना टी-शर्ट व साहित्य वाटप 


मच्छिंद्र रायसिंग गलंगी, ता. चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही आई सप्तशृंगी मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. लखलखत्या उन्हात पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना माजी सरपंच सुशिलाबाई बाविस्कर व सामाजिक कार्यकर्ते शामकांत बाविस्कर यांच्या वतीने टी-शर्ट तसेच उन्हापासून बचावासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, भाविकांमध्ये याचे विशेष स्वागत केले जाते. रामनवमीच्या दिवसापासून गलंगी येथून सप्तशृंगी गडाकडे पायी यात्रेला प्रारंभ होतो. या यात्रेत कैलास देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला मंडळ, युवक-युवती तसेच पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होत, आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक उत्साहात रवाना होतात. या सेवाभावी उपक्रमामुळे भाविकांना प्रवासात दिलासा मिळत असून, गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. 

No comments