adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वैजापूर येथे “नवचेतना बाल मेळावा” उत्साहात संपन्न

  वैजापूर येथे “नवचेतना बाल मेळावा” उत्साहात संपन्न  गलंगी, ता. चोपडा– मच्छिंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एकात्मिक बाल विकास सेवा य...

 वैजापूर येथे “नवचेतना बाल मेळावा” उत्साहात संपन्न 


गलंगी, ता. चोपडा– मच्छिंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) चोपडा-२ अंतर्गत वैजापूर येथे “नवचेतना बाल मेळावा” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (THSN) आणि ICDS विभाग चोपडा-२ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वैजापूर येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वैजापूर बीट अंतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या सहभागातून आयोजित या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रथम फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सुनंदा गावित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरवायझर सौ. जयमाला शिरसाठ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वैजापूर बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत वैजापूर आणि जिल्हा परिषद शाळेने सक्रिय सहभाग नोंदवला.

या बाल मेळाव्याचा मुख्य उद्देश लहान बालकांना आनंददायी वातावरणात शिक्षणाची गोडी लावणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा होता. बालकांच्या पहिल्या हजार दिवसांतील विकासाचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी बालविकासाशी संबंधित १० माहितीपर व उपक्रमात्मक स्टॉल्स उभारण्यात आले होते.

कार्यक्रमास वैजापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. दत्ता सिंग पावरा, उपसरपंच विद्या ताई, प्रथम फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सुनंदा गावित मॅडम, सुपरवायझर जयमाला शिरसाठ मॅडम, मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी सर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर चंद्रकांत सर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दातीर सर, ग्रामपंचायत सदस्य हर्षाली ताई तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील माता-भगिनी, बालकं आणि किशोरवयीन मुली यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पालकांनी उत्साहाने विविध स्टॉल्सला भेट देत आपल्या बालकांच्या विकासासंदर्भात उपयुक्त माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसह प्रथम फाउंडेशनच्या सुनंदा गावित मॅडम, सुपरवायझर शिरसाठ मॅडम, अंगणवाडी सेविका, शिक्षक व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच “नवचेतना बाल मेळावा” उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments