कुटुंबापेक्षा नेहमी पोलीस सेवेला प्राधान्य :- कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम ! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा)...
कुटुंबापेक्षा नेहमी पोलीस सेवेला प्राधान्य :- कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम !
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अलीकडच्या काळामध्ये सर्व क्षेत्रात महिलांची बाजी चांगलीच दिसून येत आहे. स्त्री म्हणजे केवळ कुटुंबाची आधार नसून ती समाजाची संस्कृतीची आणि प्रगतीची शक्ती आहे. अनेक भूमिकांमध्ये ती प्रेम,त्याग,धैर्य आणि कर्तृत्व यांची प्रेरणादायी उदाहरणे निर्माण करत असते. महिलांची सुरक्षिता,समानता व सशक्तीकरण हीच प्रगत समाजाची ओळख आहे. आजही अनेक ठिकाणी प्रशासकीय खात्यातील महिला देखील आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडून कर्तव्य देखील तितकेच तत्पर पार पडत आहेत. अशाच एक महिला पोलीस हवालदार त्या म्हणजे पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष आणि नेहमीच तत्पर असणाऱ्या राजगड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार आदरणीय सौ. प्रमिला शरद निकम यांना ओळखले जाते. राजगड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आदरणीय सौ. प्रमिला निकम या रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत आपल्याकडील महत्त्वांच्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे परिसरांतच नव्हे तर त्यांची पोलीस खात्यात देखील कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. त्या नेहमीच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी विशेषता:- महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर आणि प्रयत्नशील दिसून येतात. सायबर गुन्हेगारी सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती करणे, आणि सामाजिक समस्या सोडविण्यात त्या नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. त्यांच्या उत्कृंष्ट कामाबद्दल त्यांचा नेहमीच विविध पोलीस प्रशासकीय सन्मान पत्रक देवुन तसेच परिसरांतील जनतेंकडून देखील नेहमीच स्वागत होत असतं. एखाद्याबद्दल शब्द मांडायचे झाले तर फारच कमी पडतील त्यात म्हणजे महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम मॅडम यांना ओळखले जाते. त्यामुळे निकम यांना कुटुंबापेक्षा पोलीस सेवेला नेहमीच प्राधान्य देतात असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. अशा या कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार आदरणीय सौ. प्रमिला निकम यांच्या सेवेला आपल्या रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुप कडूंन तसेच तुम्हां सर्वांकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मानाचा सलाम!

No comments