चोपडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिस पाटील यांचा सन्मान चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड चोपडा : जागतिक महिला दिनानिमित...
चोपडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिस पाटील यांचा सन्मान
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा : जागतिक महिला दिनानिमित्त चोपडा येथे महिला पोलिस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून महिलांवरील अत्याचार कमी करणे आणि त्यांना समाजात समान संधी मिळाव्यात यासाठी जागृती करण्याचा दिवस आहे. डिजिटल युगात महिलांनी घर आणि करिअर यांचा समतोल साधत “सुपरमॉम” अशी नवी ओळख निर्माण केली आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी सर्व पोलिस पाटील यांच्या वतीने पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष नंदलाल बाविस्कर (वडगाव सिम) यांच्या हस्ते महिला पोलिस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थी महिला पोलिस पाटील म्हणून वंदना मोरे, सुनिता पाटील (धुपे बु.), चारुलता देवराज गलंगी, पुष्पा कचरे (मजरे हिंगोणे), अर्चना पाटील (तावसे बु.), मनीषा पारधी मराठे, रत्नाबाई पाटील (गणपूर) व अर्चना पाटील (खचणे) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील (हातेड बु.), माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील (खडगाव), ज्येष्ठ पोलिस पाटील हिरामण पाटील (घुमावल), अध्यक्ष नंदलाल बाविस्कर (वडगाव सिम), कार्याध्यक्ष नितीन पाटील (दोंदवाडे), सचिव भागवत पाटील (घाडवेल) यांच्यासह सदस्य संजय कोळी (विष्णापूर), सचिन पाटील (गलवाडे), जितेंद्र पाटील (लासूर), आनंद शिरसाठ (विचखेडा), रत्नाकर पाटील (कठोरा), दीपक पाटील (कुरवेल), अमर पावरा (मालापूर), पवन भील (निमगव्हाण), प्रल्हादसिंग भुगवाडे (उमर्टी), कालरसिंग बारेला (खऱ्यापाडाव), योगेश सोनवणे (सत्रांसेन) तसेच चोपडा ग्रामीण परिसरातील पोलिस पाटील उपस्थित होते.

No comments