adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रमजान ईद निमित्त चोपडा काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा; सामाजिक ऐक्याचा संदेश

 रमजान ईद निमित्त चोपडा काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा; सामाजिक ऐक्याचा संदेश  चंद्रकांत पाटील चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...

 रमजान ईद निमित्त चोपडा काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा; सामाजिक ऐक्याचा संदेश 


चंद्रकांत पाटील चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: रमजान ईदच्या पावन पर्वानिमित्त आज दि. 21 मार्च 2026, शनिवार रोजी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक एकता, बंधुता आणि सलोखा यांचा संदेश दिला. मुस्लिम समाजातील बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. 


या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष काँग्रेस संजीव सोनवणे, मधुकर बाविस्कर, रमेश तात्या शिंदे, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, नगरसेवक अमोल पाटील, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, माजी सभापती प्रमोद झुलाल पाटील, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन बाळकृष्ण सोनवणे, डॉ. अशोक कदम, ॲड. एस. डी. पाटील, देविदास सोनवणे, प्रतापराव सोनवणे (हातेड बु.), आरिफ सिद्दिकी, सुमित पाटील, देविदास साळुंखे, किरण सोनवणे, व्ही. के. पाटील, संदीप देसले, अनिल सोनवणे, रमाकांत सोनवणे, अबिद अली, इलियास पटेल, सुधाकर बाविस्कर, महेंद्र शिरसाठ, कैलास पाटील, प्रवीण पाटील, अशोक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, सद्भावना आणि परस्पर सन्मान यांचा संदेश देण्यात आला.

No comments