adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाटिया तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; रिपाई तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या पाठपुराव्याला यश...!

 भाटिया तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; रिपाई तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या पाठपुराव्याला यश...!  कासोदा तालुका एरंडोल प्रतिनिधी (सागर श...

 भाटिया तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; रिपाई तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या पाठपुराव्याला यश...! 


कासोदा तालुका एरंडोल प्रतिनिधी (सागर शेलार) :- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील आठवडे बाजार जवळ असलेल्या भाटिया तलावाची भूजल पातळी नैसर्गिक हवामान बदलामुळे मार्च महिन्यातच कमी होत होती. अजून दोन महिन्यांत पाणीसाठा आणखी कमी झाला असता, ज्यामुळे परिसरातील विहिरी, हातपंप आणि घरगुती बोअरची पाणी पातळी खालावली होती. 


या समस्येवर उपाय म्हणून, रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांनी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पाटबंधारे विभागाकडे तलावात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत सतत पाठपुरावा केला. अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून भाटिया तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरण्यात आला आहे. या कामासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संजय घोडके, दिलीप क्षीरसागर, बापू नसतपुरे, साहेबराव जगताप, दादा शितोळे, राजू घोडके, कैलास वाघ, अबू भाई, आणि प्रवीण बाविस्कर यांनी दोन दिवस परिश्रम घेतले. एरंडोल आणि कासोदा पाटबंधारे विभागातील अधिकारी तसेच कासोदा ग्रामपंचायतीनेही मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली. सदर कामाबद्दल वरील सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments