adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटर व केबल चोरणाऱ्या आरोपींच्या वैराग पोलीसांनी आवळल्या मुसक्या

 शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटर व केबल चोरणाऱ्या आरोपींच्या वैराग पोलीसांनी आवळल्या मुसक्या; एकुण 89,000/ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत !   सौ. शु...

 शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटर व केबल चोरणाऱ्या आरोपींच्या वैराग पोलीसांनी आवळल्या मुसक्या; एकुण 89,000/ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत ! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी  (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वैराग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटार व केबल चोरीच्या घटनामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे निदर्शनास आलं होत. याबाबात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपल्या पोलीस ठाणे कडील गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या असता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत आरोपी पर्यंत पोलिसांना पोस्ट आले आरोपी नामे (विशाल श्याम जाधव रा. साठेनगर जि. धाराशिव) यास ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने पोलिसांना चोरीची कबुली दिली. यावेळी त्यांने आपल्या साथीदार समीर अल्ताफ सय्यद समर्थनगर जि. धाराशिव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून. या दोन्ही आरोपीकडूंन वैराग पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 6 इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटरी व सुमारे 400 केबल असा एकूण 89,000/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस हवालदार भोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल आकाश पवार राहुल पवार आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. वैराग पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गातून विशेष कौतुक होत आहे.

No comments