वलांडी गटाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा लाल दिवा देवणी तालुक्यातील उषाताई पाटील तळेगावकर यांची अध्यक्षपदी वर्णी लातूर, जि. प्र.(उत्तम माने)...
वलांडी गटाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा लाल दिवा देवणी तालुक्यातील उषाताई पाटील तळेगावकर यांची अध्यक्षपदी वर्णी
लातूर, जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर:-जिल्हा परिषद अध्यक्षपदाबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार जिल्हा परिषद अध्यक्षपदी मा. उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची नियुक्ती झाल्याने वलांडीसह संपूर्ण देवणी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वलांडी गटाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान देऊन पक्षश्रेष्ठींनी तालुक्यातील कार्यकर्ते व मतदारांचा सन्मान केला आहे, याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना आता निश्चितच गती मिळेल, तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, शिक्षण, आरोग्य व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
वलांडी गटावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण देवणी तालुक्यातील जनतेचा असून, या विश्वासाला पात्र ठरत सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.भविष्यातही पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा सर्व पक्ष नेतृत्वाचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.


No comments