adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धार्मिक उत्सव • आदिशक्ती संत मुक्ताबाई फिरत्या नारळी सप्ताहाला कुंभारखेडा येथे प्रारंभ, ७०० भाविकांचे सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण

 धार्मिक उत्सव • आदिशक्ती संत मुक्ताबाई फिरत्या नारळी सप्ताहाला कुंभारखेडा येथे प्रारंभ, ७०० भाविकांचे सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण  रावेर प्र...

 धार्मिक उत्सव • आदिशक्ती संत मुक्ताबाई फिरत्या नारळी सप्ताहाला कुंभारखेडा येथे प्रारंभ, ७०० भाविकांचे सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे मंगळवारपासून आदिशक्ती मुक्ताबाई फिरत्या नारळी सप्ताहाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सोमवारी रात्री आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पादुका सप्ताहस्थळी दाखल झाल्या. दरम्यान, पहिल्याच दिवशी ७०० भाविक संत ज्ञानेश्वरी पारायणाला बसले. त्यात ६०० महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी विशेष तयार केलेल्या गाभाऱ्यात मुक्ताई पादुका ठेवून पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचपदीने सप्ताहाला सुरुवात झाली. दीपप्रज्वलन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करुन पारायणाला प्रारंभ झाला. व्यासपीठावर रवींद्र हरणे, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, नरेंद्र नारखेडे, उद्धव महाराज जुनारे, भरत महाराज, पांडुरंग सराफ, संदीप महाराज खामनीकर, गोपाळ महाराज 5 महाराज विवरेकर, दुर्गादास महाराज उपस्थित होते. उत्सवासाठी संत मुक्ताईंच्या पादुका पहिल्यांदाच तापीतीर ओलांडून केळीपट्ट्यामध्ये दाखल असे आहे सप्ताहाचे दैनंदिन नियोजन सप्ताह सोहळा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे. त्यात दररोज सकाळी ५ ते ७ काकडा आरती व विष्णूसहस्त्रनाम, ७ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ कीर्तन, दुपारी ३ ते ५ ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन होईल. बुधवारी (दि.१८) सकाळी १० ते १२ या वेळेत अनिल पाटील (बार्शी) आणि रात्री ८ ते १० या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज जोशी (बीड) यांचे कीर्तन होईल.


दीपप्रज्वलनाने सप्ताहाची सुरुवात करताना परिसरातील संत, महंत व प्रतिनिधी. सप्ताहस्थळी संत ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण करताना महिला भाविक. मोफत आरोग्य शिबिरात तपासणी अन् उपचार होणार या सप्ताहानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि संतपथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून मोफत आरोग्य शिबिर होईल, तज्ज्ञ डॉक्टर तपासणी व उपचार करतील. हे आरोग्य शिबिर १७ ते २४ मार्चदरम्यान रावेर रोडवरील कुंभारखेडा फाटा येथे होईल. शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी ५ अशी आहे. रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, सीबीसी, मलेरिया, टायफॉईड, लिव्हर व किडनी तपासणी, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल व लघवी तपासणी आदी चाचण्या करण्यात येतील. तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी चिंतन सप्ताहात  १८ ते २० दरम्यान अॅड. जयवंत महाराज बोधले, २१ ते २३ मार्च चैतन्य महाराज देगलुरकर (पंढरपूर) हे संवाद साधतील. यानंतर २३ मार्चला सकाळी १० वाजता श्री योगीराज सद्‌गुरु गंगागिरी महाराज परंपरेतील (सरला बेट) महंत रामगिरी महाराज हे विशेष उपस्थिती देऊन संवाद साधतील.

No comments