जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विटनेरला गटविकास अधिकारी अंजली बर्वे यांची भेट शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विटनेरला गटविकास अधिकारी अंजली बर्वे यांची भेट
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा, जळगाव - मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारी शाळा अर्थात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विटनेरला नवनियुक्त गटविकास अधिकारी श्रीमती अंजली बर्वे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले, शाळेची तपासणी केली, शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला तसेच शालेय परिसरातील फुल झाडे फळ झाडे लागवड केलेल्या भगतसिंग उद्यान ला भेट दिली. श्रीमती बर्वे यांनी शाळेचा संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम इत्यादी कक्षांना भेट देत विद्यार्थ्यांच्या गुणांची कौतुक केले. स्वतः जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी असल्याचे श्रीमती बर्वे विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादात म्हणाल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषद शाळेत होतो असे त्यांनी नमूद केले.
माजी विद्यार्थी संघाच्या कामाची दखल घेत माजी विद्यार्थी संघ तसेच शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची दखल घेत शाळेसाठी "सुई दोरा" नामक नवीन उपक्रम सुचवला. येत्या काळात शाळेमार्फत "सुई दोरा" हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापक श्री हेमंत भामरे यांनी दिली.
श्रीमती बर्वे यांनी दिलेल्या भेटीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे. शाळेच्या उपक्रमांची माहिती विद्यार्थिनी कु.प्रगती कोळी हिने सांगितली तर परसबाग व वन उद्यान ची माहिती शालेय मुख्यमंत्री कु.कुणाल कोळी याने दिली. या प्रसंगी सरपंच सौ.कविता मंगल पाटील,अरुणाबाई किशोर कोळी,ग्रामसेवक रवींद्र महाजन, विटनेर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी म्हणून श्री. भावालाल कोळी,मंगल पाटील,किशोर कोळी,रवींद्र कोळी, प्रविण कोळी,कुलदीप कोळी,वाल्मीक कोळी इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक श्री. विकास पाटील,श्रीमती मनिषा पाटील,प्रविण पाटील, श्री. हेमंत पाटील, उपस्थित होते. श्रीमती अंजली बर्वे मॅडमांचे स्वागत करत शाळा भेटीबद्दल शाळेची सांस्कृतिक मंत्री अंजली कोळी हिने आभार मानले.

No comments