adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत सार्थक गवळीचे उल्लेखनीय यश

 महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत सार्थक गवळीचे उल्लेखनीय यश  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (जि. जळगाव) येथील महिला मंड...

 महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत सार्थक गवळीचे उल्लेखनीय यश 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (जि. जळगाव) येथील महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूलच्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढवला आहे. इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारा चि. सार्थक संजय गवळी याने या स्पर्धात्मक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. सार्थकने 200 पैकी 118 गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने तालुकास्तरीय गुणवान यादीत 5 वा क्रमांक, जिल्हास्तरीय यादीत 19 वा क्रमांक तर राज्यस्तरीय यादीत 27 वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे सार्थकचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांचे भक्कम सहकार्य हे महत्त्वाचे घटक ठरले. शाळेच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंद आणि पालकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक अरुणभाई दामू संदानशिव यांनी सार्थकच्या यशाचे कौतुक करत, “अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेला अधिक बळ मिळते,” असे सांगितले. सार्थकच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

No comments