adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस ओ एस स्कूल इथे जागतिक चिमणी दिवस साजरा; पारस वन्य जीव संस्थेचा उपक्रम पक्षी निसर्ग साठी महत्त्वपूर्ण - प्राचार्य शरद वानखेडे

   एस ओ एस स्कूल इथे जागतिक चिमणी दिवस साजरा; पारस वन्य जीव संस्थेचा उपक्रम पक्षी निसर्ग साठी महत्त्वपूर्ण - प्राचार्य शरद वानखेडे   अमोल बा...

  एस ओ एस स्कूल इथे जागतिक चिमणी दिवस साजरा; पारस वन्य जीव संस्थेचा उपक्रम

पक्षी निसर्ग साठी महत्त्वपूर्ण - प्राचार्य शरद वानखेडे  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  पारस- जागतिक चिमणी दिवसाची औचित्य साधून वन्यजीव संस्था पारस तर्फे पक्षी घागर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम एस ओ एस स्कूल यांचे मुख्याध्यापक शरद वानखडे सर  यांच्या हस्ते घेण्यात आला असून पक्षाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा पक्षी निसर्गाचे अनमोल घटक असून वनाची निर्मिती करणारे प्रमुख हे पक्षी आहेत तसेच चिमणी हा वाढत्या काँग्रेटीकरणामुळे, औषधी फवारणीमुळे, तसेच मोबाईल नेटवर्कच्या प्रादुर्भामुळे नष्ट होत चालला आहे त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा अशी माहिती त्यावेळेस त्यांनी दिली.वन्यजीव संस्थेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. असून त्यांनी विविध ठिकाणी पक्षी घागर लावल्या. वन्यजीव संस्था ही गेल्या दहा वर्षापासून पक्षांसाठी  उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे व त्यांच्या पाणी अभावी जीव न जावे


यासाठी पक्षी घागर हा उपक्रम राबवित असून त्यांनी या वर्षी पाचशे पक्षी घागर तसेच मागच्या तीन वर्षीपासून प्राण्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने प्राणी घागर हा उपक्रम सुद्धा  सुरू केला आहे. वन्यजीव संस्थेला पक्षी घागर या उपक्रमाला गणेश साबे, प्रवीण पोटे, उमेश बांबडकर यांनी आर्थिक मदत केली असून या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित प्राचार्य शरद वानखडे, चंद्रशेखर चोपडे, परिवेक्षक गंगा कोळसकर, पल्लवी ठाकूर,अमृता खंडारे,शितल सोळुंके, चैताली वैराळे,सुमित आव्हाड, रोहित जगताप, आधी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. तसेच वन्यजीव संस्था पारस चे अध्यक्ष जगदीश रेवतकर, प्रतिभा ठाकरे, नितीन ठाकरे, अनवर अंसारी, सोनाली रेवतकर,विनय शर्मा, हरीश तायडे, अक्षय गाडगे,प्रमोद रोहनकर,ओम रेवतकर, तसेच आराध्या रेवतकर,प्रणित ठाकरे, या चिमुकल्यांनी परिश्रम घेतले.

No comments