adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे १९८४-८५ च्या दहावी तुकडीचा ४१ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे १९८४-८५ च्या दहावी तुकडीचा ४१ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात  इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे १९८४-८५ च्या दहावी तुकडीचा ४१ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात 


इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर:-  येथील म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर  मधील इयत्ता दहावी सन १९८४-८५ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तब्बल ४१ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या या तुकडीतील सुमारे ७० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी १ मार्च रोजी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्याच तुकडीतील माजी विद्यार्थी मिलिंद (बापू) वाघुळदे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा गजर देऊन प्रतीकात्मकरीत्या शाळा भरवून करण्यात आली. प्रथम राष्ट्रगीत झाले. त्यानंतर दिवंगत माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी ८० वर्षांवरील उपस्थित माजी शिक्षकांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये माजी मुख्याध्यापक पी. एस. चौधरी यांच्यासह पी. जे. राजपूत, एम. एच. वराडे, एन. एन. चौधरी, सी. डी. चौधरी, ए. ई. ठोंबरे, बी. जी. चौधरी, सी. के. चौधरी, एच. सी. किरंगे, डी. के. भंगाळे, आत्माराम भोंबे, सौ. विजय चौधरी, सौ. शकुंतला सराफ, सौ. वराडे मॅडम, ग्रंथपाल एन. एन. नारखेडे, शिपाई ईच्छाराम नारखेडे, रशीद तडवी तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के. टी. तळेले आदींची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात काही माजी विद्यार्थ्यांनी तसेच दोन शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात मिलिंद वाघुळदे यांनी त्या काळातील अनुभव सांगत, “आज आम्ही जे काही आहोत ते या शिक्षकांमुळेच. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही आयुष्यात यशस्वी झालो,” अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सराफ यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुक्षमा तायडे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष मिलिंद (बापू दादा) वाघुळदे यांचे विशेष सहकार्य लाभले. ४१ वर्षांनंतर एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले.

No comments