घोडगाव जि.प. शाळेत सांस्कृत कार्यक्रम उत्सवात साजरा मच्छिंद्र रायसिंग गलंगी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.१ मार्च२०२६ (रविवार) रोजी साय...
घोडगाव जि.प. शाळेत सांस्कृत कार्यक्रम उत्सवात साजरा
मच्छिंद्र रायसिंग गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.१ मार्च२०२६ (रविवार) रोजी सायंकाळी जि.प.केंद्रशाळा घोडगाव तालुका चोपडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम "कलाविष्कार" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विजय देवराज साहेब व्यवस्थापकीय संचालक (मृद व जलसंधारण विभाग छ.संभाजीनगर), शाळेचे माजी विद्यार्थी श्री विजय ठाकरे (PSI) तसेच केंद्रप्रमुख प्रमोदजी बाविस्कर उपस्थित होते. दोन्ही साहेबांनी शाळेची व विद्यार्थ्यांची प्रशंसा केली आम्ही सुद्धा जि.प.चे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगितले.
या प्रसंगी उपसरपंच किशोर दुसाने,सदस्य चेतन पाटील,मिनाजबी मन्यार, शा.व्य.समिती अध्यक्षा सौ.सोनल धनगर, सर्व सदस्यगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "होता जिवा म्हणून वाचला शिवा" हे नाट्य तसेच पुलवामा हत्येत शहीद जवानांना श्रद्धांजली हा भावनिक प्रसंग नाट्यीकरणाने सादर करुन बालकलाकारांनी लोकांची मने जिंकली. कार्यक्रमाला महेंद्र पारधी, राजेंद्र धनगर, जगन कुंभार व सर्व शिक्षक वृंद यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रास्ताविक ग्रेडेड मुख्याध्यापक विलास पाटील यांनी केले व सुत्रसंचालन राजशेखर सोनवणे सरांनी केले.

No comments