adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून चुंचाळे गायरान प्रश्न निकाली; ११५ घरकुलांसाठी जागा मोजमाप सुरू

 आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून चुंचाळे गायरान प्रश्न निकाली; ११५ घरकुलांसाठी जागा मोजमाप सुरू  सं...

 आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून चुंचाळे गायरान प्रश्न निकाली; ११५ घरकुलांसाठी जागा मोजमाप सुरू 



संजीव शिरसाठ चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  चुंचाळे ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवरील दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे ११५ आदिवासी कुटुंबांना घरकुलासाठी जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघाल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चुंचाळे गावातील गायरान जमिनीवर पावरा समाजातील अनेक आदिवासी कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, जागेच्या प्रश्नामुळे त्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळत नव्हता. आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली तितऱ्या बारेला, रेलसिंग बारेला, कीर्ती बारेला यांसह आदिवासी बांधवांनी घरकुलासाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. यासाठी माजी आमदार लताताई सोनवणे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती.

या पाठपुराव्यानंतर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधत प्रश्न निकाली काढला. त्यानुसार पंचायत समितीमार्फत ११५ घरकुलांसाठी जागा वाटप व मोजमाप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गायरान प्रश्न निकाली निघाल्यामुळे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, महिला व पुरुषांसाठी शौचालये तसेच घरकुल योजना राबविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांचे परिसरातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

मोजमापप्रसंगी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच नौशाद मुबारक तडवी, उपसरपंच सरला सुधाकर कोळी, सदस्य कुर्बान जाफर तडवी, रहेमान मेहरबान तडवी, संजय देविदास पाटील, मनोज फकिरा धनगर, बैतुल कलिंदर तडवी, जरीना मजित तडवी तसेच पोलीस पाटील रेवलसिंग बारेला, अनिल पावरा यांच्यासह ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : ११५ घरकुलांसाठी जागेचे मोजमाप

गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या आदेशान्वये पंचायत समितीच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिनेश पाटील, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी तसेच ग्रामसेवक निकेतन बिऱ्हाडे यांनी जमिनीचे मोजमाप केले. प्रधानमंत्री आवास योजना व शबरी योजनेअंतर्गत ११५ आदिवासी कुटुंबांना घरकुलासाठी जागा मोजून देण्यात आली आहे.

चौकट : आदिवासींच्या घरकुलाचे स्वप्न साकार

आदिवासी बांधवांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन उपोषणही करण्यात आले होते. आमदारांच्या प्रयत्नांमुळे आज हा प्रश्न सुटला असून आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरत आहे. 


— संजीव पांडुरंग शिरसाठ, आदिवासी सेवक

No comments