शेतात केळीचा पेरा मात्र पिक विमा केला रिजेक्ट; विमा हप्ता भरूनही शेतकरी हवालदिल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारत एक कृषीप...
शेतात केळीचा पेरा मात्र पिक विमा केला रिजेक्ट; विमा हप्ता भरूनही शेतकरी हवालदिल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारत एक कृषीप्रधान देश आहे.भारताची अर्थव्यवस्था देखील बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे. परंतु नापिकी,बदललेले हवामान तसेच बाजारपेठा उपलब्ध न होणे, धान्याची नासाडी,शेती पिकांना लागणाऱ्या मटरेल अर्थात खाद्याचा तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडतात.लहान बाळाचे पालन,पोषण करावे या पद्धतीने आपल्या पिकाची शेतकरी वर्षभर काळजी घेतात.
असे असताना बऱ्याच अंशी बदललेले हवामान यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.हाता-तोंडाशी आलेला घास त्याला गमवावा लागतो. अशाच हेतूने प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी थोडा आधार ठरत असतो.
अंबिया बहार योजनेतील केळी पिकविमा घेतलेल्या काही शेतकऱ्यांचे विमा आता रिजेक्ट करण्यात आले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे जुलै,ऑगस्ट मधील असलेली केळी लागवड ज्याला आज दहा महिन्यांचा कालावधी लोटला किंव्हा बदललेले हवामान व वादळी वाऱ्यामध्ये पिकाचे नुकसान झाल्याने संपूर्ण केळी पीक नष्ट झाले आहे.असेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात आज देखील केळी पीक आहे पण त्यांचा पीक विमा रिजेक्ट करण्यात आला आहे.
विटनेर तालुका चोपडा येथील काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना आपल्या शेतात केळी पीक असताना विमा कंपनीने दावा नाकारलेला असल्याने येत्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आंदोलन करू असा इशारा दिला आहे.



No comments