adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यात्रेच्या टेंडरचा वाद.. नगरसेवकाला गोळ्या घालण्याची धमकी शहरात एकच खळबळ

 यात्रेच्या टेंडरचा वाद.. नगरसेवकाला गोळ्या घालण्याची धमकी शहरात एकच खळबळ  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-रा...

 यात्रेच्या टेंडरचा वाद.. नगरसेवकाला गोळ्या घालण्याची धमकी शहरात एकच खळबळ 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-राहाता तालुक्यात राहाता महाराज यात्रेतील पाळण्याच्या टेंडरवरून वाद चिघळत नगरसेवकांना पिस्तूलचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी तुषार सदाफळ व त्याच्या १० ते १२ साथीदारांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,५ मार्च रोजी तुषार सदाफळ याने फोनवरून नगरसेवक दशरथ तुपे यांच्याबाबत संताप व्यक्त करत “यात्रेतील पाळण्याचे टेंडर बाहेरच्या व्यक्तीला देऊन माझ्या पोटावर पाय देणार का?” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.त्यानंतर त्याने जवळील परवानाधारक पिस्तूल काढून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.याच दिवशी रात्री सुमारे १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपीने १०-१२ जणांना एकत्र जमवून “याचा काटाच काढू” अशा प्रक्षोभक घोषणा देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर नगरसेवक दशरथ तुपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,आरोपीच्या धमक्यांमुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून आम्ही भयभीत आहोत.शिवाजी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी आणि आम्हाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे. पोलिसांकडून गुन्हा दाखल या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

No comments