नालासोपारा पश्चिम समेळपाडा येथे विजेचा लपंडाव,नागरीक त्रस्त ! अमोल बावस्कार बुलडाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नालासोपारा ता, ७ :- नालासो...
अमोल बावस्कार बुलडाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता, ७ :- नालासोपारा शहरातील प्रभाग क्र ११ मधिल समेळपाडा येथे सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. सातत्याने सुरू असलेल्या या विजेच्या लपंडावाने नागरीक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यास महावितरणाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता तेथिल दुरध्वनी उचलला जात नाही, त्यामुळे नागरीक आणखी त्रस्त होत आहेत असा आरोप स्थानिक नागरीकांनी रूचिताताई नाईक यांच्याकडे केला आहे. दिवसातून ४ ते ५ वेळा विज पुरवठा खंडीत होत असल्याने महावितरण चे स्थानिक अधिकारी व नगरसेवक वीज पुरवठा अखंडित राहिल यादृष्टीकोनातून कोणतीही कृती करत नसल्याकारणाने नागरीक संतप्त आहेत.सततच्या विज लपंडावा-संदर्भात महावितरणच्या मुख्य-अभियंता यांची भेट घेऊन सततच्या खंडीत वीज पुरवठ्याची माहिती तसेच वीज- पुरवठा सुरळीत राहिल, यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक करणार आहेत.

No comments