adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती सर्वानुमते गठित

 फैजपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती सर्वानुमते गठित   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर : येथील डॉ. बाबासाह...

 फैजपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती सर्वानुमते गठित  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आयोजित बैठकीत सर्वानुमते जयंती समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी दिपक विकास हिवरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी चंद्रमणी मेढे, कार्याध्यक्षपदी सागर भालेराव, सचिवपदी अतुल मेढे तर खजिनदारपदी अमर मेढे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून गौरेश वानखेडे व जितेंद्र मेढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून नितीन तायडे, हर्षल मेढे आणि सौरभ गाढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस बौद्ध पंच ट्रस्टचे धनराज मेढे, सुरेश मेढे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश कनाशी मेढे तसेच चेतन मेढे, राजनंदन मेढे, रोहित मेढे, पवन मेढे, अनिकेत साळुंखे व अर्पित मेढे उपस्थित होते. बैठकीत यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक ऐक्य आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.

No comments