adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार हेमकांत गायकवाड यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांकडून गंभीर दखल; अधीक्षक अभियंता बदली प्रकरणी तातडीच्या कारवाईचे आदेश..

  सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार हेमकांत गायकवाड यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांकडून गंभीर दखल; अधीक्षक अभियंता बदली प्रकरण...

 सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार हेमकांत गायकवाड यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांकडून गंभीर दखल; अधीक्षक अभियंता बदली प्रकरणी तातडीच्या कारवाईचे आदेश..




नाशिक / जळगाव प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली संदर्भातील प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला अखेर या प्रकरणाची नोंद घ्यावी लागली आहे.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागामार्फत मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रामध्ये अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे (सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव) यांच्या बदली संदर्भातील यापूर्वी पाठविण्यात आलेल्या अनेक पत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रकार हेमकांत गायकवाड (जिल्हाध्यक्ष – ऑल इंडिया ब्लू टायगर सेना व स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना) यांनी दिनांक १२/०१/२०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित प्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने या प्रकरणावर योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल अर्जदारास तात्काळ कळविण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणी यापूर्वीही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असूनही संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनातील दिरंगाई आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार हेमकांत गायकवाड यांनी भ्रष्टाचार व गैरप्रकारांविरोधात सातत्याने आवाज उठवत विविध शासकीय विभागांकडे तक्रारी केल्या असून या प्रकरणातही न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

No comments