हंबर्डी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.. भरत कोळी यावल (प्रतिनिधी) : - (संपादक :- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील हंबर्डी येथे एका विवाहित...
हंबर्डी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
भरत कोळी यावल (प्रतिनिधी) : -
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील हंबर्डी येथे एका विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सुधाकर मेढे (वय ३४, रा. हंबर्डी, ता. यावल) या विवाहित तरुणाने गुरुवार (दि. ५ मार्च) रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मयताची आई घरात गेली असता त्यांना नितीन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, संबंधित तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत नितीन मेढे यांचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी केले. या घटनेप्रकरणी सुरेश बाळू मेढे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत...

No comments