adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विज्ञान दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ’चे आयोजन

  विज्ञान दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ’चे आयोजन  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

 विज्ञान दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ’चे आयोजन 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : देवगिरी विज्ञान प्रतिष्ठान, जळगाव जिल्हा आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

या स्पर्धेत जळगाव शहरातील विविध शाळांमधील सुमारे साठ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर व सीनियर अशा दोन गटांमध्ये प्रश्नमंजुषा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख स्वरूपातील बक्षिसे महाविद्यालयाच्या वतीने प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान भारती, जळगाव जिल्हा संयोजक डॉ. माधुरी पाटील, डॉ. के. बी. पाटील तसेच सायस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे परीक्षण विज्ञान भारतीचे सदस्य अमोघ जोशी यांनी केले.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान व सेंट टेरेसा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली.

No comments