फैजपूर येथे जमाअते इस्लामी हिंद, तर्फे ईद मिलन आणि परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) इब्...
फैजपूर येथे जमाअते इस्लामी हिंद, तर्फे ईद मिलन आणि परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
इब्राहिम मजीद परिसरात ईद मिलन व परिचय' कार्यक्रम, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हिंदू, सिंधी समाज बांधव पोलिस अधिकारी आजी माजी नगरसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. काही वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली, ज्याचे मराठी भाषांतर वसीम खान यांनी सादर केले. प्रास्ताविक भाषण जमाअते इस्लामी हिंद फैजपूरचे अध्यक्ष अब्दुल रऊफ साहेब यांनी केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सोहेल अमीर शेख यांनी 'ईद मिलन व मस्जिद परिचय' कार्यक्रमाची गरज का आहे, यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमात माजी आमदार शिरीषदादा चौधरी पांडुरंग सराफ पोलीस निरीक्षक सय्यद साहेब मोईन साहेब गुरवसर इत्यादी वक्त्यांनी जमाअते इस्लामीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
आणि आज समाजाला प्रेम, बंधुभाव आणि एकमेकांच्या धर्माची शिकवण समजून घेण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याबद्दल जमात-ए-इस्लामीचे कौतुक करण्यात आले. डॉ. इकराम साहेब (प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉक्टर विक्रम साहेब अहिल्यानगर) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रोजा, रमजान, कुरान आणि ईद-उल-फित्र बद्दल सविस्तरपणे मराठी भाषेत माहिती दिली.
ईद मिलन सर्व हिंदू बांधवांनी मस्जिद प्रवेश केला. नमाज पठणापूर्वी डॉ. इकराम साहेबांनी 'इस्लाममध्ये मस्जिदचे महत्त्व' या विषयावर आपले विचार मांडले. मस्जिदचे मौलाना सोबत मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली, जे हिंदू बांधवांनी अतिशय शांततेने आणि लक्षपूर्वक पाहिली व ऐकली. डॉ. इकराम साहेबांनी सांगितले की, नमाजमध्ये जे कुरान वाचले जाते, त्याचे आचरण आपल्या जीवनात आणि समाजात करण्याकडे मार्गदर्शन केले शेवटी, अब्दुल रऊफ जनाब यांनी आभार प्रदर्शन केले आणि मस्जिद परिचय' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला करण्यात जे आई एच फैजपूर चे सर्व सदस्य व कार्यकर्ते, आणि एस आय ओ, युथ मुव्हमेंट एम पी जे या सर्वांची महत्त्वाची भूमिका राहिली

No comments